स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान लोगो स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान
Registration No: E9587(P) धर्मादाय आयुक्त, पुणे
7218185650  |  9561617969
Registration No. E9587(P) | धर्मादाय आयुक्त, पुणे

स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान

१५ ते ३५ वयोगटातील युवतींसाठी — शक्ती, संस्कार आणि स्वाभिमान

शौर्य
धैर्य
आत्मशक्ती
आमच्याबद्दल जाणून घ्या सहभागी व्हा
15–35 वयोगट (वर्षे)
8 दिवसांचे निवासी शिबिर
3 त्रिसुत्री - शौर्य, धैर्य, आत्मशक्ती
4+ वार्षिक उपक्रम
प्रस्तावना

संस्थेची ओळख

बदलत्या काळात स्त्री सशक्तीकरण ही केवळ गरजच नव्हे, तर आपली जबाबदारी आहे.

स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान ही १५ ते ३५ वयोगटातील युवतींसाठी कार्य करणारी एक प्रेरणादायी सामाजिक संस्था आहे. आजच्या बदलत्या काळात स्त्री सशक्तीकरण हा केवळ एक विषय न राहता एक गरज बनली आहे आणि याच जाणिवेतून संस्थेची उभारणी झाली आहे.

संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण या त्रिसूत्रीवर आधारित कार्य करत संस्था युवतींना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवत नाही तर मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही सबळ करण्याचे ध्येय ठेवते.

"जिथे नारी सशक्त, तिथेच समाज सुरक्षित आणि राष्ट्र समृद्ध — याच ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान प्रत्येक युवतीमध्ये शौर्य, धैर्य आणि आत्मशक्तीची ज्योत प्रज्वलित करत आहे."

संस्था "शौर्य, धैर्य, आत्मशक्ती" या त्रिसूत्रीचा समतोल विकास साधते — शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही आघाड्यांवर प्रत्येक युवती सक्षम व्हावी हेच संस्थेचे स्वप्न आहे.

प्रशिक्षणाची त्रिसूत्री

संस्कार

भारतीय संस्कृती, मूल्ये आणि परंपरांचे संगोपन

संस्कृती

नृत्य, संगीत, चित्रकला व सांस्कृतिक उपक्रम

स्वसंरक्षण

आत्मरक्षण कौशल्ये व शारीरिक सामर्थ्य

संस्थेचे कार्य

उद्दिष्टे व ध्येय

सक्षम युवती – सशक्त समाज – समर्थ राष्ट्र

महिला सशक्तीकरण

शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाद्वारे प्रत्येक युवतीला सक्षम बनवणे.

संस्कार व समाजप्रबोधन

सनातन मूल्यांचे जतन करून समाजात सांस्कृतिक जागृती निर्माण करणे.

संरक्षण प्रशिक्षण

आत्मरक्षण कौशल्ये शिकवून प्रत्येक युवतीला स्वावलंबी बनवणे.

नेतृत्व गुण

सामाजिक सहभाग वाढवून नेतृत्व क्षमता व संघभावना विकसित करणे.

संस्कृतीप्रेरित उपक्रम

नृत्य, संगीत, चित्रकला, संगीत — सांस्कृतिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन.

मानसिक व शारीरिक विकास

योग, प्राणायाम, व्यायामाद्वारे संपूर्ण स्वास्थ्य जपणे.

समाज जागृती

शौर्य यात्रा, वक्तृत्व स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरांद्वारे सामाजिक बदल.

❀ ❀ ❀

"शौर्य आमची ओळख, धैर्य आमचा मार्ग आणि आत्मशक्ती आमचा आधार."

स्वसंरक्षण प्रशिक्षण

प्रशिक्षण शिबिर

दरवर्षी मे महिन्यात आयोजित आठ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर — महिला प्रशिक्षकांद्वारे संचालित.

नियुद्ध (कराटे)

आत्मरक्षणासाठी कराटे व हस्तयुद्ध तंत्र

तलवारबाजी

पारंपरिक शस्त्रकला — तलवार, दांडपट्टा

रायफल शूटिंग

लक्ष्यवेध कौशल्य व एकाग्रतेचे प्रशिक्षण

घोडेस्वारी

पारंपरिक अश्वारोहणाचे प्रशिक्षण

दांडपट्टा

मराठा परंपरेतील विशेष शस्त्रकला

योग व प्राणायाम

मन व शरीराचे संतुलन राखण्यासाठी

बौद्धिक मार्गदर्शन

विचारशक्ती, नेतृत्व व निर्णयक्षमता विकास

शारीरिक खेळ

विविध शारीरिक खेळ, चपळता व सहनशक्ती

आठ दिवसीय निवासी शिबिर — मे महिना

या शिबिरात युवतींना एकत्र राहून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. यामुळे सहकार्य, शिस्त, आत्मनिर्भरता आणि संघभावना विकसित होते. प्रशिक्षित महिलाच प्रशिक्षण देतात — त्यामुळे आत्मीयता, सुरक्षितता व विश्वासाचे वातावरण निर्माण होते.

वार्षिक कार्यक्रम

उपक्रम व कार्यक्रम

वर्षभर विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रेरणादायी उपक्रम.

नवरात्र

नवरात्र उत्सव — स्त्रीशक्ती संचलन व शौर्य प्रदर्शन

युवतींनी पारंपरिक शस्त्रकला, नृत्य आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले. समाजात स्त्रीशक्तीचा गौरव आणि आत्मविश्वास वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

गुढी पाडवा

हिंदू नववर्ष — स्त्री आत्मशक्ती संचलन

गुढी पाड्याच्या निमित्ताने महिलांनी आत्मशक्ती संचलन करून समाजात संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमातून समाजात एकात्मता आणि संस्कारांची जाणीव निर्माण होते.

२६ डिसेंबर

वीर बाल दिन — जनजागृती कार्यक्रम

वीर बालकांच्या बलिदानाची आठवण करून देत समाजात धैर्य, शौर्य आणि धर्मनिष्ठेची प्रेरणा दिली जाते. या दिवशी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करून तरुण पिढीला इतिहासातून प्रेरणा दिली जाते.

ताराराणी जयंती

महाराणी ताराराणी जयंती / पुण्यतिथी

ताराराणींच्या शौर्यगाथेचे स्मरण करून महिलांना नेतृत्वगुण, संघर्षशीलता आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा दिली जाते. या कार्यक्रमातून स्त्री नेतृत्वाचे महत्त्व समाजात अधोरेखित होते.

मे महिना

महिला/युवती शौर्य प्रशिक्षण — निवासी शिबिर

आठ दिवसांचे निवासी शिबिर — दांडपट्टा, रायफल, तलवार, घोडेस्वारी, नियुद्धासारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणासोबत योग, प्राणायाम आणि बौद्धिक मार्गदर्शन दिले जाते. प्रत्येक युवतीमध्ये आत्मविश्वास, सामर्थ्य आणि आत्मसन्मान जागृत होतो.

प्रेरणास्रोत

शूर वीरांगना

आमच्या महान पराक्रमी इतिहासातून प्रेरणा घेत संस्था प्रत्येक युवतीत त्याच शक्तीची ज्योत जागवते.

राजमाता जिजाऊ

स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या महान माता

राणी लक्ष्मीबाई

झाशीची राणी — शौर्य आणि देशप्रेमाचे अमर प्रतीक

अहिल्याबाई होळकर

न्यायी व कर्तृत्ववान राज्यकर्त्या — स्त्री नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण

स्वराज्य सौदामिनी ताराराणी

शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या अजेय महाराणी

मीडिया कव्हरेज

सेवेचा प्रवास वृत्तपत्राच्या पानावर!

संस्थेचे कार्य आणि उपक्रम राष्ट्रीय व स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित

वृत्तपत्र कव्हरेज 1
वृत्तपत्र कव्हरेज 2
वृत्तपत्र कव्हरेज 3
वृत्तपत्र कव्हरेज 4
वृत्तपत्र कव्हरेज 5
जिथे नारी सशक्त, तिथेच समाज सुरक्षित आणि राष्ट्र समृद्ध — याच ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान प्रत्येक युवतीमध्ये शौर्य, धैर्य आणि आत्मशक्तीची ज्योत प्रज्वलित करत आहे.
शौर्य आमची ओळख धैर्य आमचा मार्ग आत्मशक्ती आमचा आधार
संस्थापक

आमची टीम

संस्थेच्या उभारणीमागे समर्पित व्यक्तींचे अथक परिश्रम

सौ. अमृता श्रीकांत नळकिडे

सौ. अमृता श्रीकांत नळकांडे

संस्थापिका, अध्यक्ष
विश्वस्त
श्री. श्रीकांत अशोक नळकिडे

श्री. श्रीकांत अशोक नळकांडे

खजिनदार
विश्वस्त
सौ. कृपा हृषीकेश प्रोदय

सौ. कृपा हृषिकेश श्रोत्रीय

सचिव
विश्वस्त
श्री. हृषीकेश विष्णू प्रोदय

श्री. हृषिकेश विष्णू श्रोत्रीय

विश्वस्त
विश्वस्त सदस्य